रंग मनाचे या माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत...
मित्रहो,
पत्रकारामधील संवेदनशील लेखक व कवी जगला पाहिजे, जपला गेला पाहिजे असे वाटते. बातमी लिहिणे, संपादन करणे, त्यावर काथ्याकूट करणे, जिथे कमी पडेल तिथे मजकूर पाडून देणे या आणि अशा कामांमध्ये व्यग्र असताना मनाच्या कोपऱ्यामध्ये कोणे एके काऴी दडवून ठेवलेले रंग कधी अचानक आठवतात, काही आठवणी जाग्या होतात, उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या पहिल्या लेखाचा कागद मनाच्या तळाशी अजूनही ताजा असल्याचे जाणवते। कोऱ्या कागदाची हाक येते आणि त्यास प्रतिसाद देण्यासाठी हातातील पेन अनावर होते...अशा सर्वांसाठी...सर्वांच्या मनामधील स्वतंत्र रंगांना सलाम....
सांगायचे राहून गेलेले, सांगता न आलेले, विसरुन गेलेले सर्व काही इथे शेअर करा...इतरांशी...
पाहुया हे शेअरिंग कशी रंगत भरते ते.....
मनःपूर्वक शुभेच्छा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा