सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

जगण्याच्याही पल्याड काही....

जगण्याच्याही पल्याड काही
आयुष्याच्या आहेत वाटा ;
मनात ज्याच्या जितके सागर
त्यांच्या तितक्या आहेत लाटा


शुद्धीबुद्धीचे टाकून ओझे
काही जगावे धुंदीचे क्षण ;
क्षणांत ऐशा जिंकुनि घ्यावे
अज्ञातांचे गहिवरले मन ...